Each payment you make on thelockerguy is secured with strict SSL encryption and PCI DSS data protection protocols
product description
Why choose thelockerguy wholesale?
आखाडबळी - विज्ञान कितीही पुढे गेले तरी देव, धर्म, या संकल्पना आहेतच. श्रद्धा असणे गैर नाही, मात्र अंधश्रद्धा प्रगती, विकासाला मारक ठरते. यातूनच अन्याय, अत्याचार, हीन वागणूक त्याच्या वाटेला येते. समाजाचे हे चित्रण सोपान खुडे यांनी ‘आखाडबळी’ मधून केले आहे. पोतराजाच्या प्रथेतून एका कुटुंबाची कशी वाताहत होते, हे यातून दाखविले आहे. देवऋषी धर्माप्पाला समाजात मानाचे स्थान असते.
पण देवाच्या नावाखाली समाजाला आपल्या तालावर नाचवणे, महिलांवर अत्याचार करणे, असे त्यांचे उद्योग सुरु असतात. यातूनच पोतराजाच्या प्रथेचे पालन करायला लावल्यानंतर मरीबाच्या संसाराला घरघर लागते. मरीबाचा भाऊ शंकर या प्रथेचे निर्मुलन करण्यासाठी संघटना उभी करतो व पोतराज झालेल्या आपल्या पुतण्याला रघुला यापासून दूर नेतो. आयुष्यातील ही नवी पहाट रघूला समाधान देते. देवाच्या नावाने चाललेला खेळ कसा घातक आहे, हे यातून दिसते.
ही कादंबरी अतिशय छान आहे. लेखक सोपान खुडे यांनी ग्रामीण भागातील पोतराज पंथाचे वर्णन अतीशय बारकाईने केले आहे. पोतराजा चे जीवन व त्यांची समाजाकडून होणारी पीळवणुक व पोतराज अंधश्रध्दे तुन कसा मुक्त होतो. ईच्छा नसताना सुध्दा पोतराज का व्हावे लागते याचे हुबेहुब वर्णन या कादंबरी मध्ये सोपान खुडे सर यांनी केले आहे. आजही काही दलित समाजामध्ये ही प्रथा चालू आहे त्यामुळे दलित समाजातील विशेष करून तरुणांनी ही कादंबरी आवश्य वाचावी. यातुन भरपुर काही शिकण्यासारखे आहे.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan) Author : सोपान खुडे (Sopan Khude) Binding : Paperback ISBN No : 9788187549680 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 169gms Width : 21 Height : 13.9 Length : 0.7 Edition : 1 Pages : 136